मौजे डिग्रस, ता. पालम, जि. परभणी येथे काल रात्री शिवजयंतीचा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन गायकवाड पाटील आणि पहाडी आवाजाचे धनी, प्रचंड अभ्यासू शिवव्याख्याते दिलीप भोसले पाटील यांनी उपस्थितांना शिवचरित्राच्या तेजस्वी विचारांनी मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास सरपंच नामदेव कुरे, ज्येष्ठ नागरिक देविदास कुरे, सांगाळे सर, अँड. विष्णू सावंत तसेच संपूर्ण गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुंदर आणि ओघवते सूत्रसंचालन माधव कुरे यांनी केले.
या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि राज्यकारभाराच्या आदर्श तत्त्वांची प्रेरणा उपस्थितांना मिळाली. उपस्थित शिवप्रेमींनी व्याख्यानांचा जल्लोषात आनंद घेतला आणि जय भवानी, जय शिवाजी! च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.




0 Comments