जालना मारहाण प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत, आरोपी नवनाथ दौंड हा त्यांचा 'राईट हँड' असल्याचे म्हटले. तसेच, याबाबतचे फोटोही असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांना खडे बोल सुनावले.
"किचडाचे प्रश्न विचारू नका. आम्ही चुकीला साथ देत नाही. मी कुणाचेही समर्थन करत नाही. आम्ही प्रामाणिक आणि सभ्य माणसं आहोत," असे परखड उत्तर देत जरांगेंनी हाके यांच्या आरोपांची हवा काढून टाकली.
मात्र, लक्ष्मण हाके यांनी एका विशिष्ट समाजाच्या नेत्याला गोवण्याचा प्रयत्न केल्याने, हा प्रयत्न जातीवाद भडकवण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा आरोपांमुळे आंदोलन आणि समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.
तुमच्या मते, हाके यांच्या आरोपांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा.

0 Comments