नागपूर: पीएम किसान आणि नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ हजार रुपये दिले जातात. राज्य सरकारकडून लवकरच यामध्ये तीन हजार रुपयांची अतिरिक्त भर टाकली जाणार असून अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली. पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत तो पैसे कामात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. परिणामी, राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात वाढ देखील केली जाईल. त्यामुळे वर्षाला 15 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते (ऑनलाइन) वितरण होत आहे. नागपूरच्या वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना ही घोषणा केली आहे.

0 Comments