मुंबई : सीबीएसई'च्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १५ जून ऐवजी १ एप्रिलपासून करण्याचा प्रस्ताव सुकाणू समितीने शासनाला दिला आहे. हा निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे.
दरम्यान राज्यात फक्त नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. या अभ्यासक्रमाची आखणी सीबीएसईच्या धर्तीवर केली असून, हा बदल वगळता काहीही बदल झाला नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर शिक्षक, शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालक यांचा गोंधळ निर्माण झाला होता.

0 Comments