पुणे – बारामती आणि परिसरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासन वारंवार आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने त्या उद्या (4 मार्च) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
बारामतीसह पुणे जिल्ह्यात अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतरही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांवर वेळ काढली जात आहे. यावर आक्रमक भूमिका घेत सुप्रिया सुळे यांनी थेट उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
या उपोषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे प्रशासन सतर्क झाले असून, काही तातडीच्या उपाययोजना केल्या जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments