मुंबई – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या अत्याचारी कारकिर्दीचे उदात्तीकरण करत नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी दावा केला की “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताचा जीडीपी २४% होता आणि त्यामुळेच इंग्रज भारतात आले!” मात्र हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे.
औरंगजेब – एक क्रूरकर्मा की ‘उत्तम प्रशासक’?
अबू आझमींनी औरंगजेबाचे महत्त्व वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी इतिहास मात्र काही वेगळेच सांगतो. हा तोच औरंगजेब आहे ज्याने हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली! काशी विश्वनाथ, मथुरेतील केशवराय मंदिर आणि असंख्य हिंदू मंदिरं जमीनदोस्त केली.
छत्रपती संभाजीराजांचा निर्घृण छळ करून हत्या केली! मराठ्यांचे स्वराज्य संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.हिदूंवर जिझिया कर लादला! हिंदूंकडून जबरदस्तीने कर उकळला.धर्मांधतेच्या नावाखाली लाखो लोकांचा संहार केला! शीख गुरू तेग बहादूर यांना निर्दयतेने ठार मारलं.
‘सोने की चिडीया’ नव्हे, तर लुटीचा बाजार!
औरंगजेबाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती हा दावा हास्यास्पद आहे. वास्तविक, त्याच्या सातत्याने चाललेल्या युद्धांमुळे मुघल साम्राज्य आर्थिक गर्तेत गेले. तो स्वतः एक साधी टोपी शिवून पैसे कमवत असल्याचा ढोंगी दावा करत होता, पण वास्तवात संपत्तीवर अपार लूट आणि अत्याचार सुरू होते.
इतिहासकार सांगतात की औरंगजेबाच्या चुकीच्या धोरणांमुळेच मुघल साम्राज्य कोसळले! त्याच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता पूर्णपणे रसातळाला गेली आणि त्याचा परिणाम ब्रिटिशांच्या भारतावरील वर्चस्वात दिसून आला.
भाजपचा संताप – ‘हे देशद्रोहासारखं विधान!’
अबू आझमी यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “औरंगजेब हा भारताच्या वैभवाचा नाश करणारा क्रूर सुलतान होता. त्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे देशद्रोहासारखं आहे!” असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
सोशल मीडियावर गदारोळ – #Aurangzeb #AbuAzmi ट्रेंडिंग!
अबू आझमींच्या विधानानंतर ट्विटर आणि फेसबुकवर यावर जोरदार टीका सुरू आहे. “इतिहास वाचून या, औरंगजेबाचा गौरवगान करणं म्हणजे लाखो हिंदूंच्या बलिदानाचा अपमान आहे!” अशी संतप्त प्रतिक्रिया लोकांकडून येत आहे.
अबू आझमींवर कारवाईची मागणी!
अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी अबू आझमींवर देशाच्या इतिहासाचा अपमान केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. काहींनी त्यांना माफी मागण्याचा इशारा दिला आहे.
तुम्ही काय म्हणता?
➡️ औरंगजेबाचा उदोउदो करणं योग्य आहे का? की हा इतिहासाचा अपमान
आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा!

0 Comments