सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये वाल्किम कराडच नाव एक नंबर वर
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता तीन महिने उलटत असताना मोठी माहिती आता उघडकीस आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचाअसलेला वाल्मीक कराडच नंबर एकच आरोप आहे अस सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये म्हणल आहे.
सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा उल्लेख आहे तर दोन नंबर वरती विष्णू चाटेच नाव आहे. संतोष देशमुख यांची हत्या पूर्णतः खंडणीच्या वादातून झाली आहे अस या चार्जशीट मध्ये म्हटलं आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोन वरून वाल्मीक कराडने खंडणीची मागणी केली होती त्यानंतर 6 डिसेंबरला सुदर्शन घुले व त्याचे सहकारी खंडणी मागण्यासाठी आले असता संतोष देशमुख यांच्याशी वाद झाला. त्यावरूनच 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
दरम्यान मुख्य आरोपी वाल्मीक कराड हे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे निकवर्कीय मानले जातात. परंतु वाल्मीक कराड खंडणी गोळा करून हत्या करत असेल तर असे मानस धनंजय मुंडे यांनी पाळून त्यांना नेमका कोणता विकास करायचा होता अशी चर्चा आता जनमाणसात होत असताना दिसत आहे.

0 Comments