पुणे : स्वारगेट मध्ये 25 फेब्रुवारीला बस मध्ये तरुणीवर बलात्कार झाला. नंतर 28 तारखेच्या पहाटे दत्तात्रय घाडे या आरोपीला शिरूर तालुक्यातील गुणाट गावात त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
"या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी न्यायालयात सांगितले की, 'स्वारगेट बसस्थानक हा गजबजलेला भाग आहे. जर तरुणी विरोध करत होती, तर तिने मदतीसाठी का ओरडले नाही? तसेच, घटनेनंतर आरोपी पळून न जाता दोघेही बसमधून बाहेर आले.' त्यामुळे हा बलात्कार नसून परस्पर संमतीने संबंध झाले असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला."
पोलिसांनी आरोपीच्या बचावात्मक दाव्यांची दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज, पीडितेचे वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे सत्य शोधले जात आहे. पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे, आणि पोलिसांकडून आणखी खुलासे अपेक्षित आहे
.jpeg)
0 Comments