Pune : पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी पहाटे साडेपाच वाजता फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट एसटी आगारात (swargate st depot) आली होती. याठिकाणी शिवशाही बसने (Shivshahi Bus) या तरुणीला फलटणला जायचे होते. त्यावेळी एसटी आगारात असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे या गु्न्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीने तिची दिशाभूल करुन तिला दुसऱ्या एका बसमध्ये नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला.
दरम्यान माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोड-फोड केली आहे.
सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असा सवाल करत वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली आहे.
वसंत मोरे यांनी बस स्थानकावर जात आगारात कोण कोणते गैरप्रकार सुरु आहेत, याबाबत भाष्य केलंय. यावेळी बंद असलेल्या बसेसमध्ये कंडोम, साड्या आणि अंतर्वस्त्र सापडल्या आहेत.पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेस मध्ये साडी, शर्ट आणि कंडोम्स सापडल्यानंतर वसंत मोरेंनी आगारातील कार्यालयाची तोडफोड केली आहे.
शिवाय, स्वारगेट स्थानकात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील वसंत मोरेंनी केली आहे. फलटणकडे जात असलेल्या तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर स्वारगेट स्थानकातील गैरप्रकार समोर येत आहेत

0 Comments