मुंबई : महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकला आहे. राज्यात कोणते उद्योगधंदे येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे. ते आज धारावीत आले होते. वाचा नेमकं काय म्हणाले?
एका युवतीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात तेथीलच एका बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली. वसंत मोरे यांनी घटनेच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी स्वारगेट आगारातील एका कार्यालयाच्या काचा फोडल्या तसेच घटनास्थळाची पाहणी करून स्वारगेट आगारातील सुरक्षा आणि स्वच्छतेची भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या नजरेस आणून दिली. अतिशय आक्रमकतेने वसंत मोरे यांनी कार्यालय फोडून उपस्थितांना दटावले. घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते असे विचारत संबंधित घटनेला सुरक्षारक्षकही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
वसंत मोरे यांच्या आंदोलनाची नोंद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. तुम्ही काल पुढाकार घेऊन चांगले आंदोलन केले. आपला लढा याच प्रवृत्तीविरोधात आहे, असे सांगत मराठीचा अवमान ते दृष्ट प्रवृत्तीच्या विरोधातील लढा जोमाने लढा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पुण्याची घटना गंभीर असल्याचे सांगत हे सगळं बघून जीव जळतो… अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

0 Comments