असल्याचा खळबळजनक दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
'धाराशिवमधील पोलिसांनी, कर्मचाऱ्यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला मदत केली. त्यांच्यावरही कारवाई व्हावी' अशी मागणी धस यांनी माध्यमांसमोर केली आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांनी केली मदत
धाराशिवमधील वाशीच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली. नितीन बिक्कड यातील आरोपी आहे. या सर्वांची चौकशी होऊन स्वतंत्र मकोका लावावा किंवा सहआरोपी करावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
बिडचे आमदार सुरेश धस सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवच्या परंडा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुरेश धस उपस्थित होते. तेव्हा बोलताना धस यांनी 'संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत, सत्कार स्वीकारणार नाही', असे वक्तव्य केले.


0 Comments