प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर-चित्रपट निर्माती फराह खान, लोकप्रिय शो सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये सहभागी झाली आहे. या कूकिंग रिऍलिटी शो मध्ये होळीच्या सणाबद्दल अलिकडेच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे फराह खान वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हिंदुस्तानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेले विकास पाठकने वकिलाद्वारे तक्रार दाखल केलीय. २० फेब्रुवारी रोजी एका शो च्या एपिसोडमध्ये फराहने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तक्रारीत विकास पाठकने दावा केला की, फराह खानने होळीला ‘छपरियों का त्योहार’ म्हटलं.
या तक्रारीमुळे समाजातील काही घटकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि अनेकांनी या सेलिब्रिटीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
2.png)
0 Comments